Monday, 11 June 2018

सोबत

"सोबत"

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
"स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'

पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
"आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....
गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो.
नातेवाईकांशी बोलणे म्हणजे काही काम असेल तर किंवा फक्त काही चांगले किंवा वाईट प्रसंग घडले तरच, आपल्यापैकी किती जण फक्त उगीच आठवण आली म्हणून नातेवाईकांकडे जाऊन येतात?  आणि हल्ली तर सगळेजण इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे जाताना देखील आज घरी आहेत का? वेळ आहे का , कुठे बाहेर तर नाही ना जाणार हा सगळा सोपस्कार करून जावे लागते, असा सोपस्कार ना करता जर आपण कुठे जाऊ शकत असू तर ठीक  त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते. 
आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. नाहीतर मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत. आणि सोबत छंदांची जोड.

सागर नाईकडे

Tuesday, 19 December 2017

संवाद

संवाद

काही दिवसांपूर्वी एक वेब सिरीज पहिली होती . Lets Talk..!

त्यातील विषयाचा आशय घेऊन संवाद का महत्वाचा असतो ह्यावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होईल?
समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे. आत येणारा झरा नाही. बाहेर जाणारा मार्ग नाही. तर काय होईल?

कुकर चा स्फोट होईल आणि डबक्याच्या आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल. वास येऊ लागेल. दुर्गंधी येऊ लागेल.

मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही. भावनांना वाट मिळाली नाही. की मनात विकृती निर्माण होते. अन यासाठी गरज असते संवादाची!

अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे.

संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊबहीण, पतीपत्नी, पितापुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो. 
काय गंमत आहे बघा, संवादाच्या खिडक्या बंद करुन माणसं ‘सहजीवन’ जगत असतात. मग काय होतं, मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो.

संवादच संपला की उरतो तो वाद.

संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवे पैलू पडतात. आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं.

तेव्हा बोलू लागा... ऐकू लागा... समजू लागा... संवाद साधू लागा...!

सागर नाईकडे.

Monday, 3 October 2016

योग्य निर्णय

"काय रे  काय चाललंय ?"
      ह्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच मित्रांकडून ऐकले आहे की "कामाचा कंटाळा आला आह राव ". तेच तेच रुटीन असल्याने  वैतागलो आहे ; स्वत:चं काही सुरु करायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही. आणि अशीच बरीच उत्तरं

हल्लीचं लाइफस्टाईलच तसं झाल्यासारखं दिसून येतंय. जो तो फ्रस्ट्रेट झाला आहे. आणि प्रोब्लेम सुटला नाही की मग याचा राग कुठेतरी निघत असतो. मग तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या नोकरवर्गावर असेल. जवळच्या मित्र मैत्रिणींवर असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर असेल. सर्वजणच त्या माणसापासून दूर रहायला लागतात. मग हा गुंता वाढत जाऊन त्याचं पर्यवसान कुठल्यातरी टोकाच्या भूमिकेत होतं.

मग आपण घेतलेल्या टोकाच्या भूमिकेचा विचार करायला लागतो. आपलंच काही चुकलय का याचा विचार करत बसतो. आपल्या बाजूने विचार केला तर आपण बरोबर असल्याच जाणवतं आणि दुसऱ्याच्या बाजूने विचार केला की तोही चुकीचा वाटतं नाही. आपल्याला कळत नाही की काय चूक आणि काय बरोबर आहे. जीवनात असे अनेक प्रसंग येतात अशावेळी आपण कुणाच्या तरी सल्ल्याने वागू लागतो.

अशा या वेळी योग्य निर्णय पुढील सर्व चुकीच्या गोष्टी टाळू शकतात. असे निर्णय घेण्यासाठी आपण प्रत्येक घटनेकडे थर्ड पार्टी बनून पाहिलं पाहिजे. आपण स्वत:च 'समाज' व्हायला हवं. बुद्धिवादी व्यक्तिंना जे पटतं ते स्वीकारायला हवं. शांत डोक्याने घेतलेले योग्य निर्णय हे तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुखद करतील.

निर्णय घेताना नेहमी पूर्ण जबाबदारी स्वीकारून घ्यावा की जेणेकरून आपण स्वतः घेतलेल्या निर्णयाला कधी दूसरे जबाबदार नसावेत. 

फक्त काळजी इतकीच घ्यावी की या निर्णयांना फार उशीर लावू नये. 

सागर नाईकडे 😊

Sunday, 20 March 2016

सबसे खतरनाक - अवतार सिंह संधू "पाश "

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... तशीच ही एक कविता जी डोक्यात भुंगा सारून गेली. कवी पाश ह्यांची कविता.

आपण आवर्जून वाचावयास हवी अशी कविता 😊🙏

सबसे खतरनाक  - अवतार सिंह संधू "पाश "

मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी सबसे खतरनाक नहीं होती

बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी सी चुप्पी में जकड़े जाना बुरा तो है
पर सबसे खतरनाक नहीं होता
सबसे खतरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
ना होना तड़प का
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौट कर घर आना
सबसे खतरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना
सबसे खतरनाक होती है, कलाई पर
चलती घडी, जो वर्षों से स्थिर है।
सबसे खतरनाक होती है वो आंखें
जो सब कुछ देख कर भी पथराई सी है
वो आंखें जो संसार को प्यार से
निहारना भूल गयी है
वो आंखें जो भौतिक संसार के
कोहरे के धुंध में खो गयी हो
जो भूल गयी हो दिखने वाली
वस्तुओं के सामान्य
अर्थ और खो गयी हो व्यर्थ के खेल
के वापसी में

सबसे खतरनाक होता है वो चांद
जो प्रत्येक हत्या के बाद उगता है
सूने हुए आंगन में
जो चुभता भी नहीं आंखों में
गर्म मिर्च के समान
सबसे खतरनाक होता है वो गीत जो
मातमी विलाप के साथ कानों में पडता है
और दुहराता है बुरे आदमी की दस्तक
डरे हुए लोगों के दरवाजेपर
मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी
सबसे खतरनाक नहीं होती

सबसे खतरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना.

अवतार सिंह संधू “पाश”

Sunday, 13 March 2016

चूक की बरोबर ?

चूक की बरोबर

If right and wrong don’t exist, we are free to act, we can do whatever we want. We are free to choose. However, we are fully responsible for our acts and for all consequences that follow those acts. there is no one to blame!
- Anonymous

काय चूक काय बरोबर ह्यावर कधी विचार केलाय का ? ठरवतात कोण की हे चूक आणि हे बरोबर.

मला अस नेहमी वाटायच काहीतरी नियमावली पहिज, जी  आपल्याला सांगेल की काय बरोबर आणि काय चूक. काय do's आहेत आणि काय dont's आहेत जगण्याचे. अर्थात आपल्याकडे भारतीय संविधान आहे ज्या मधे बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत कसे वागायचे.
पण हे संविधान लिहिण्या आधी गरज पडली असेलच की चूक बरोबर ठरवण्याची. मग ते कोण ठरवत असेल ?

काही गोष्टी आहेत ज्या मला वाटतात चूक आहेत आणि काही गोष्टी मला बरोबर वाटतात. म्हणजे हेच की चूक की बरोबर हे judgement वर ठरते. मग हे judgement करणारे कोण ? तर ते ठरवणारे म्हणजे आपला समाज (society around us). आणि ह्या समाजाला पूरक अस आपण वागलो की आपण बरोबर असतो. किंवा बरेचदा आपणच ठरवत असतो काय चूक आणि काय बरोबर.

व पु काळे ह्यांचं एक वाक्य आहे " समोरचा माणूस आपल्याला हवा तसा वागत नाही म्हणजे तो बिघडला आहे "

जेंव्हा आपण ठरवतो की काय चूक आणि काय बरोबर, तेंव्हा आपली असलेली मानसिकता आणि situational need ह्यावर बरच काही अवलंबुन असत. किंवा ते ठरवताना आपण किती emotionally attached आहोत हे पण गरजेचे आहे.

म्हणून मला अस वाटत की काही चूक की बरोबर असे ठरवायाचे असेल तर काही मिनट साठी त्या situation मधे आपण नाही (as a third person) अस समजून त्या situation  ला  चूक की बरोबर हे ठरवल पहिजे.

आता मी हे लिहिलेले चूक की बरोबर तुम्ही ठरवा.😉

सागर नाईकडे.

Tuesday, 1 March 2016

अताशा असे हे मला काय होते

आपलं आपलं असं सगळं मस्त चाललं असतानाच असं काय आहे, जे इतकं त्रास देतंय?....
छे छे, आपण दु:खात, त्रासात आहोत याचा आनंद कोणी उपभोगत असेल तर आपण का बरं असा आनंद द्यायचा  त्यांना?.... नाही म्हटलं तरी मान्य करायलाच पहिजे की जखम खोल आहे, आतपर्यंत गेलेली रूतन बसलेली.....
पण का ठेवायच्या अशा फ़ुकट जखमा?....लोकांच काय आहे? आज जरी आयुष्यात आहेत उद्या नक्की आहेत का ?...काल परवा जी होती ती तरी आज कुठे आहेत?....ते दिवस गेले, हेही जातीलच....हा सगळा त्रास का? ही अस्वस्थता का?
सगळं काही ठीक असताना मनाची शांतता, समाधान गेलं कुठे? कोणीतरी म्हणजे अगदी शब्दश: कोणीतरी ज्यांचा आपल्या आयुष्याशी काहीएक संबंध नसतो अशी माणसं आपलं सुख, मनाची शांतता अशी ओरबडून घेऊन निघून जातात आणि आपणही उसासे सोडत बसावं?..... असं नेमकं काय झालंय की रोजच्या दिवसातला आनंद हरवून गेलेला आहे......
आनंद तुमच्या हातात आहे. तो कोणीही तुमची इच्छा नसताना हिरावून घेऊ शकत नाही, असली फ़िलॉसॉफ़ील कोट्स वाचताना एकाचवेळेस आतून बरं वाटत असतं..... पण ते तेवढ्या पूरतच.
माझी हक्काची माणसं, त्यांच्या आयुष्यात माझ्या असण्यानं खुष असतानाही अशी वैतागवाणी माणसं माझ्या आयुष्यात असण्यानं इतका का फ़रक पडावा?.....नकोच पडायला खरं तर...फ़रक पडतो हेही खरंच....गेले काही दिवस.... नव्हे महिने, या परिस्थितीतून जात असताना स्वत:शी वारंवार विचारलेला, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला हा प्रश्न,  "अताशा असे हे मला काय होते ?".....
आहे काही उत्तर?
लोक असे का वागतात? त्यांच्या वागण्याचा त्रास आपल्याला काहीएक कारण नसताना का होतो? आपल्या चांगुलपणाचा फ़ायदा घेत रहाण्याचा अघोरीपणा करून यांना नेमकं कोणतं सुख मिळतं?...थोडा निर्ढावलेपणा यायला हवा....दूर्लक्ष करता येण्याइतका...गेलात उडत म्हणण्याइतका......

स्वतःचे वागणे हे इतकेच आपल्या हातात असते अश्या निष्कर्षावर मी आलो  आहे....अनेकांच्या अनेक तऱ्हा आणि खरेतर जगात तऱ्हेवाईकपण बरंच आढळते.... आपण कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही.... आकाशातल्या  पावसाळी ढगांचे जसे सांगता येत नाही तसेच स्वभावाचे पण सांगता येत नाही...

अनेक वेळा घोर लावून जातात अनेक प्रसंग, आणि मग, "अताशा असे हे मला काय होते "...अस वाटू लागते...

सागर नाईकडे

Thursday, 18 February 2016

काहीच बदल नाही

घर ऑफिस व ऑफिस घर प्रवास
काही म्हणजे काहीच परिवर्तन नाही 
तोच रस्ता तीच माणसे तीच कामे
मनाला काहीच म्हणून बदल नाही

त्रुतू येतात हवेत बदल घडवतात 
पण रूटीन बदल काहीच नाही
तोच तोच पणाचा कंटाळा आला
कंटाळ्याच्या तिव्रतेतही बदल नाही

जिंकणे हरणे चढ़ाओढ़ चालली नुसती
त्या मानसिकतेत बदल काहीच नाही
मैच निवडणुका कुठेही तुम्ही बघा
या सारया चर्चेत बदल काहीच नाही

दिवस रात्र पहाट दुपार संध्याकाळ 
येतात जातात त्यात बदल काहीच नाही
तारीख वार वर्ष बदलतात फक्त 
ते जाउनही बदल काहीच नाही

अपेक्षा ठेवून अच्छे दिन यायची
उद्याच्या काळजीत बदल काहीच नाही
उम्मीद पे दुनिया कायम असते फक्त
वाक्य तेच त्यात बदल काहीच नाही

सागर नाईकडे