"काय रे काय चाललंय ?"
ह्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच मित्रांकडून ऐकले आहे की "कामाचा कंटाळा आला आह राव ". तेच तेच रुटीन असल्याने वैतागलो आहे ; स्वत:चं काही सुरु करायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही. आणि अशीच बरीच उत्तरं
हल्लीचं लाइफस्टाईलच तसं झाल्यासारखं दिसून येतंय. जो तो फ्रस्ट्रेट झाला आहे. आणि प्रोब्लेम सुटला नाही की मग याचा राग कुठेतरी निघत असतो. मग तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या नोकरवर्गावर असेल. जवळच्या मित्र मैत्रिणींवर असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर असेल. सर्वजणच त्या माणसापासून दूर रहायला लागतात. मग हा गुंता वाढत जाऊन त्याचं पर्यवसान कुठल्यातरी टोकाच्या भूमिकेत होतं.
मग आपण घेतलेल्या टोकाच्या भूमिकेचा विचार करायला लागतो. आपलंच काही चुकलय का याचा विचार करत बसतो. आपल्या बाजूने विचार केला तर आपण बरोबर असल्याच जाणवतं आणि दुसऱ्याच्या बाजूने विचार केला की तोही चुकीचा वाटतं नाही. आपल्याला कळत नाही की काय चूक आणि काय बरोबर आहे. जीवनात असे अनेक प्रसंग येतात अशावेळी आपण कुणाच्या तरी सल्ल्याने वागू लागतो.
अशा या वेळी योग्य निर्णय पुढील सर्व चुकीच्या गोष्टी टाळू शकतात. असे निर्णय घेण्यासाठी आपण प्रत्येक घटनेकडे थर्ड पार्टी बनून पाहिलं पाहिजे. आपण स्वत:च 'समाज' व्हायला हवं. बुद्धिवादी व्यक्तिंना जे पटतं ते स्वीकारायला हवं. शांत डोक्याने घेतलेले योग्य निर्णय हे तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुखद करतील.
निर्णय घेताना नेहमी पूर्ण जबाबदारी स्वीकारून घ्यावा की जेणेकरून आपण स्वतः घेतलेल्या निर्णयाला कधी दूसरे जबाबदार नसावेत.
फक्त काळजी इतकीच घ्यावी की या निर्णयांना फार उशीर लावू नये.
सागर नाईकडे 😊
Right
ReplyDelete