Sunday, 28 December 2014

एकदाच खरं खरं

एकदाच खरं  खरं !!!

कुणी खूप थेट बोलले तर उद्धट  म्हणायचं
आणि कुणी योजनाबद्ध बोलले तर राजकारणी म्हणायचं
नेता म्हणजे खोटी आश्वासनं  पोलिस म्हणजे लाच
कलाकार म्हणजे व्यसन..  खेळाडू म्हणजे fixing..
व्यापारी म्हणजे फसवणूक.. salesman म्हणजे चोर..
वचन म्हणजे  मोडणारच आणि नियम म्हणजे तोडणारच...
देऊळे म्हणजे चप्पल चोर आणि lecture म्हणजे  नक्की बोअर
असच का समजतो आपण ?
हे सगळ विसरून
एक दिवस फक्त एक दिवस सकाळ पासूनच हसून पाहूया घराच्या छताकडे.
आणि मग शोधूया पेपर मधे काय छान आहे 
समोरचा माणूस खोट बोलतोय हे माहित असूनही
त्याच्या खांद्यावर मान टाकूया, मग त्यालाही वाटेल खरं बोलावसं
ऑफिस ला जाताना लहान मुलांकडे पाहूया
आणि आपल्या लहान पणाला आठवूया,
कि आपण हि इतकच निरागस होतो कधीतरी
आणि इतकच  हसत होतो स्वच्छ,
तोच स्पार्क हरवून बसलोय का आपण?
कुठेही फक्त एकदाच विचार  निर्णय घेणारे आपण
आता इतका विचार करून नक्की खुश आहोत ?
आपण  आजही तसं वागू शकतो
पण  आपणच स्वतः ला बांधून ठेवलंय उगीच..
आपण आजही तितकच सुंदर जगू शकतो
आणि खरं वागू शकतो असच थोडीच मरणार?
त्या आधी एकदा तरी खरं  खरं जगावं 
एकदाच खरं  खरं !!!   

No comments:

Post a Comment