Wednesday, 21 October 2015

स्वतः चे मित्र बना

माणसं कधीच बदलत नाहीत, भावना बदलत जातात, एकमेकांकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलत जातो आणि माणूस तसा वागू लागतो.
गुणांमुळे जवळ येतो, दोष खटकु लागतात, खटके उडतात, तर कधी गुण पण आवडतात आणि दोष ही तेवढेच.
मनातले सारे घोळ भावना बदल्यामुळेच होतात, मग एका क्षणाला कोणी सांगत किंवा आपण स्वतः ला ताब्यात ठेवलं पहिजे...पण माणूस म्हणजे machine नव्हे programme  केलेल्या robot सारखे जगायला.
माणूस आहे मग भावना आल्याच पण त्या भावनांसाठी एक योग्य रस्ता लागतो मोकळे होण्यासाठी, अन्यथा गैरसमजही होऊ शकतात. आणि हया भावनांमुळेच घडतात आणि बिघडतात नाती.
ह्या भावनांच ओझ वाहनं जड असत, म्हणून मोकळ व्हाव कुठेतरी, भावनांच ओझ वाटू लागल्यावर प्रत्येक गोष्टीतून आपणच स्वतः ला  बाहेर काढू शकतो,
स्वतःचीच  मदत करूण आणि स्वतःचेच खरे मित्र बनून.

सागर नाईकडे

No comments:

Post a Comment